SALE -15%
|| वास्तुविचार||

|| वास्तुविचार||

0 reviews
₹170 ₹200
Product Code: product 21
Stock 49

आजच्या प्रदुषित वायुमंडळाच्या काळात जेव्हा बुद्धीचे तेज, मनाचे ओज, आणि अहंकाराचा तोल यामध्येही, पडझड झाली असताना या पौर्वात्य शास्त्रांचा एकमेव आधारच माणसाचे त्रिविध स्तरांवर संरक्षण करून जीवनात सुखसंवाद करू शकतो. हिंसा, कौर्य, क्रोध, प्रदूषण, आणि अतिरेकी
कारवायांच्या काळात ज्याचे घर परंपरागत शास्त्राप्रमाणे असेल त्याला सभोवती एक नैसर्गिक उर्जाकवच प्राप्त होते, तो आपोआपच 
दिग्बंधनामुळे काळावर मात करतो, निसर्ग त्याचे अकाल मृत्युंपासून संरक्षण करतो. 

एक अभ्यास म्हणून अनैसर्गिक 'मृत्यू' झालेल्या घरांचा अभ्यास केल्यास सर्वत्र समान दोष दिसून येतात. उत्तम अनुभव देणाऱ्या घरामध्ये उत्तर ईशान्य पूर्वेचे प्रवाह दिसून येतात. दिशा, प्रभाग, देवता, तत्व, उर्जा अशा विविध अंगांनी शास्त्राची मांडणी करून सत्याचे बहुव्यापक व सर्वसमावेशक स्वरूप जाणता येते. या अभ्यासाच्या योगे नवीन उपाय व मार्ग सापडतात. 

जो शास्त्राधारे चालतो त्याला प्लास्टिकचे चमचे, पिरॅमिड वापरण्याचे कारण नाही. लेकरअँटेनाची 'हाथ कि सफाई', 'प्लास्टिक पिरॅमिडचे वापरातील चतुराई' अशा बाह्य कचकड्यांची गरज पारंपारिक शास्त्राप्रमाणे चालणाऱ्यास अजिबात नाही. 'विना तोडफोड वास्तुशास्त्र' हीपण अशीच एक धूळफेक आहे. या सर्व मतांचा आणि तत्वांचा परामर्ष या विविश लेखांतून घेतला आहे.