प्राजक्त प्रकाशन ही संस्था जालिंदर चांदगुडे यांनी सन १९९९ साली स्थापन केली आहे. गेली अठरा वर्षांपासून आम्ही विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करीत आहोत . महाराष्ट्रातील पुस्तक प्रकाशन क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संस्थांमध्ये प्राजक्ता प्रकाशन या संस्थेचे नाव घेतले जाते.

    आम्ही कादंबरी , कथासंग्रह , बालसाहित्य ,आत्मचरित्र , धार्मिक ,आध्यात्मिक , ऐतिहासिक , प्रवासवर्णने अनुवादित अशा वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित करीत आहोत.

    संस्थेने आजपर्यंत चारशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत . प्रसिद्ध लेखक जगन्नाथ कुंटे , निरंजन घाटे ,विजय कुवळेकर , संजय सोनवणी , नरेंद्र साहसबुद्धे , पंढरीनाथ सावंत , चंद्रकांत भोंजाळ , प्रभाकर ओव्हाळ , विजय कुंभार , सुरेश खरे , भास्कर महाजन ,अंबादास गवंडी , सुधाकर गुंजाळ , जगन्नाथ शिंदे , सुरेश वैद्य अशा अनेक मान्यवर लेखकांची पुस्तके आम्ही आता पर्यंत प्रकाशित केलेली आहेत.