फेंग शुई
फेंगशुई हे चीनचे गुढशास्त्र आहे. पौर्वात्य परंपरा, धर्म, रुढींमधील सर्व सूत्रांचा समावेश यात आहे. फेंग म्हणजे 'पवन' म्हणजे प्राण आणि 'शुई' म्हणजे 'आप' म्हणजे जलतत्व. याचा अर्थ 'जलतत्वाच्या स्वभावाचा प्राण' असा होतो.
भारतीय, चीनी व तिबेटी परंपरांचा आधार 'फेंग शुई'ला आहे. उर्जेच्या निर्मितीचा संबंध 'प्राण'तत्वाशी जोडलेला असल्याने या शास्त्रास 'उर्जाशास्त्र'ही म्हणतात. ही माहिती देऊन वास्तुशास्त्रात त्याचा उपयोग का व कसा करायचा, त्यापासून काय फायदे होतात हे डॉ. नरेंद्र हरी सहस्त्रबुद्धे यांनी फेंग शुई उपाय - साधना- सिद्धी' यातून विशद केले आहे.
फेंग शुई तत्त्वज्ञान, त्यातील 'यीन' व 'यँग' हे दोन उर्जाप्रवाह, पूर्व व पश्चिम दिशा, शुभाशुभ गट, लाकूड, अग्नि, पृथ्वी, धातू व जल हे फेंग शुईतील पंचचिद्वस्तू म्हणजे काय, फेंग शुईतील 'स्कूल' विचारपद्धती, आकार व विचार कंपास स्कूल म्हणजे दिशा विचार, फ्लाईंग स्टार - चलित नक्षत्र विचार, फेंगशुई - उपाय रचना, इण्ड फेंग शुई याची सर्व माहिती देऊन आकृत्यांच्या साह्याने मार्गदर्शन केले आहे.