वास्तु ज्योतिष
ज्योतिष शास्त्रावर विश्वास असणाऱ्यांनी आपल्या पत्रिकेचा आधार घेऊन वास्तूशास्त्राचा अभ्यास केला, तर त्याचा लाभ होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे. या पुस्तकात डॉ. नरेंद्र हरी सहस्त्रबुद्धे यांनी प्रारंभी ज्योतिषशास्त्राची माहीती दिली आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात वास्तू शास्त्राचे १०० नियम दिले आहेत.
चौथ्या प्रकारणात वास्तूसंबंधातील ज्योतिषावर चर्चा केली आहे आणी पाचव्या प्रकरणात घट-घटना-घटाकाश यांचा अभ्यास केला आहे. दिशा, देवता, उर्जा विचारात घेऊन 'योगशास्त्रामध्ये प्राणतत्त्वाच्या आधारे तर वास्तू शास्त्रामध्ये पृथ्वीतत्वाच्या आधारे उर्जा आविष्काराची मांडणी केली आहे, 'असा दावा ते करतात. वास्तू शास्त्राचा विकास दिशांच्या आधारे झाला आहे, असेही ते म्हणतात.