Description
स्कूल डेज अर्थात माझ्या आठवणीतलं नवोदय विद्यालय हे शबनम पठाण हिचे पुस्तक. केंद्र सरकारच्या योजनेनुसार देशभर नवोदय विद्यालये स्थापन झाली. या विद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा घेऊन गुणवान विद्यार्थ्यांना निवडले जाते. देशातील हा वेगळा प्रयोग. अगदी ग्रामीण भागातील मुलांनाही या विद्यालयांमुळे चांगल्या शिक्षणाची व वेगळ्या वातावरणाची संधी मिळाली. या वातावरणाचे आणि नवोदय विद्यालयातील जीवन शबनम पठाण हिने अत्यंत हळुवारपणे लिहिले आहेत. कुठेही तक्रारीचा सूर न लावता छान प्रसन्न शैलीतील हे लेखन एक वेगळे विश्व वाचकांसमोर आणते. खरे तर नवोदय विद्यालयातील त्रुटींवर कितीतरी लिहिता येतील असे प्रसंग यात जाणवतात. पण शबनमने त्याकडे दुर्लक्ष करून केवळ सकारात्मक पद्धतीने या आयुष्याबद्दल लिहिले आहे.





Reviews
There are no reviews yet.