Description
स्फुट लेखन हे ललित, माहितीपर आणि आस्वादात्मक अशा तीन प्रकारात करता येते. पण एकंदरीतच स्फुट लेखन हे घाई गर्दीनं कराव लागणारं लेखन आहे. त्यासाठी लेखक हा नुसता बहुश्रुत असून भागत नाही तर त्याचं वाचन ही चौफेर असाव लागतं. तो आपल्या आवडीच्या क्षेत्रात रमणारा आणि त्याचा सूक्ष्म अभ्यास करणारा असावा लागतो. नुसताच चटपटीत चुरचुरीत लेखन करणारा लेखक कदाचित वाचकांचे मनोरंजन करू शकेल पण वाचकांच्या ज्ञानात कसलीच भर पाडू शकणार नाही. त्यामुळे आपण निवडलेल्या विषयातील घडणा-या घटना, त्यांचे अन्वयार्थ जाणून घेऊन आणि भविष्यात घडणा-या घटनांचा वेध घेऊन या सगळ्यांचा अर्थ तो वाचकांना उलगडून सांगू शकेल तोच चांगला स्फुट लेखक होऊ शकतो.





Reviews
There are no reviews yet.