Description
संवेदनशील मनाने घेतलेला अनुभव लेखक विजय कुवळेकर यांनी या कादंबरीतून टिपला आहे. कळत नाही, तरी हवसं वाटतं, असं अनेकदा अनेक बाबतीत घडतं, तेव्हा किती वेगळचं सुखद वाटतं; नाही?’ रात्र चाफ्याच्या फुलांच्या रूपगंधानं दरवळतं राहिली.’ ‘ ह्या स्वप्नातलं सगळचं अद्भुत… अनोखं होतं.
त्यातलं खरं काय होणार? अशा प्रश्नांच्या गुंत्यात, एखादा दगड दुरून भिरभिरत यावा तसा हा प्रश्न. ‘सावित्रीवहिनींची टप्पल लागत नाही… हळुवार असते.’ ‘ मनात आगीच्या ज्वाळा सळसळायला लागल्या… बघता बघता उंचउंच होतं.. भडकत उधाणात गेल्या…अशी तरल वाक्ये कादंबरीच्या पानोपानी समोर येतात. पौडांगवस्थेतील एका मुलाच्या भावविश्चाचं हे आतलं आकाश या वाक्यांमधूनचं प्रकट होतं





Reviews
There are no reviews yet.